Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नांदगांवसदो येथे शॉक लागल्याने दोन महिला गंभीर जखमी

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगांवसदो येथे दोन महिलांना विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर महीलांना घोटी येथील समर्थ हॉस्पीटल येथील खाजगी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगांवसदो येथील रहिवासी सावळीराम नामदेव भागडे व छबन मोतीराम राक्षे यांच्या घरावरून महावितरणची विद्युत तारेचा प्रवाह गेला आहे. शेजारी असलेल्या पोलवरुन चार पाच घरांना लाईट कनेक्शन दिले आहे. गेल्या महिना भरापासुन येथील तारा खाली लोंबकळत असल्याने भागडे व राक्षे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अभियंता लोखंडे यांना याबाबत लेखी तक्रार दिली.

मात्र कर्मचारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही. पावसाळा सुरु झाल्यावर सुध्दा त्यांनी घरावरून लोंबकळत असलेल्या तारा त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी वारंवार केली. मात्र याकडे येथील कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले. शनिवारी रात्री छबन राक्षे यांच्या पत्नी नंदा राक्षे या घरातील लोखंडी शिडीने दुसऱ्या मजल्यावर जात असतांना त्या लोखंडी शिडीला चिटकल्याने त्यांनी आरडा ओरडा केला.

ही बाब नंदा यांच्या दिराच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत नंदा यांच्या हातावर प्लास्टीकच्या पाईपचा फटका मारल्याने त्या बचावल्या. गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पावसामुळे येथील तीन घरांमधे विद्युत प्रवाह उतरला असल्याने सदरची घटना घडली आहे. तसेच लोंबकळणाऱ्या तारांबाबत वारंवार तक्रार देऊनही त्या दुरुस्त न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

शॉक लागलेल्या नंदा राक्षे यांचे पती रीक्षा चालवुन आपला उदरनिर्वाह करत असल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल.
-व्यंकटेश भागडे, शिवसेना पदाधिकारी, नांदगांवसदो

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!