Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Share

इगतपुरी । वार्ताहर : रविवारी पहाटे दरम्यान नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासुन सतंतधार पाऊस सुरु आहे.

या सतंतधार पावसामुळे घाटातील ब्रेकफेल पाँइट जवळ दरड कोसळल्याने काही काळ मुंबईला जाणारी वाहतुक ठप्प झाली होती. या घटनेची माहीती समजताचं टोलप्लाझावरील पिंक इंफ्राचे कर्मचारी व कसारा घाटातील वाहतुक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड हटवुन वाहतुक सुरळीत केली.

आज रविवार असल्याकारणाने मुंबई महामार्गावर वाहतूक जास्त प्रमाणात आहे. पावसामुळे घाटात ठीक ठीकाणी फॉल तयार झाले असुन प्रवासी कार चालक हे फॉल पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी येथे गर्दी करत असल्यानेही अपघाताचा धोका वाढला आहे.

तसेच कालपासून पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धुके आले आहे. यामुळे वाहनचालकांना कसारा घाटातून जाताना दिवसाढवळ्या गाडीच्या लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!