Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ऐन पावसाळ्यात खोदकामामुळे तीन लकडीपुलाला धोका

Share
इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरी शहराला जोडणाऱ्या जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील तीन लकडी पुलाच्या अगदी बाजुलाच केबल टाकण्यासाठी रेल्वेने ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या पावसाचे दिवस असुन या आठवड्यातचं तालुक्यातील वैतरणा विद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाज्या बाहेर दरड कोसळल्याने हा प्रकल्प तीन महीन्यांकरता बंद करण्यात आला. तर कसारा घाटातील हीवाळा ब्रीज जवळील रेल्वे बोगद्या समोर रेल्वे रुळावर थेट मातीचा मोठा ढीगारा कोसळला. तसेच मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात महामार्गावर दरड व झाड कोसळले होते.
तसेच भंडारदराला जाणाऱ्या रस्त्यावर भावली डॅम जवळ दरड कोसळली होती. या घटना ताज्या असतांनाचं ऐन पावसाळ्यात चाळीस वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजुला केबल टाकण्यासाठी मोठया प्रमाणात खोदकाम केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. चाळीस वर्षापुर्वी बांधण्यात आलेला हा पुल कमकुवत झाला असुन या खालुन दररोज शेकडो मेल एक्सप्रेस व माल वाहतुक रेल्वे गाड्या धावत आहेत.
तर शहरात येण्यासाठी हा एकमेव पुल असुन पुल कमकुवत झाला असुन पुला वरून गाडी गेल्यावर हादरा बसत असुन पुलाला काही झाल्यास मोठी जिवीतहाणी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वे गाडीचा हा एकमेव मार्ग या पुलाखालुन जात आहे. यामुळे पुलाला काही झाल्यास मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतुकही ठप्प होऊ शकते.
ऐन पावसाळ्यात या पुलावर खोदकामासाठी परवानगी देणाऱ्या अधिकारींवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. गेली चार दिवसापासुन रेल्वे विद्युत पुरवठा होणारी सर्व विजेच्या तारा या पुलाव वरून मोठया टॉवरला जोडल्या गेल्या होत्या. त्या विजेच्या तारा भुमीगत करण्यासाठी पुलाचा रस्ता खोदकाम मोठ्या प्रमाणात केल्याने शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना खडयांमध्ये पाय रोवत यावे जावे लागत आहे.
 शहरातील मुख्य दळण-वळण मार्गक्रमाच्या पुलाच्या रस्त्यावरील खोदकाम त्वरीत पुर्ण करून रस्ता पुर्वरत व्हावा व नागरीकांची गैरसोय टाळावी अशी मागणी नगरसेवक दिनेश कोळेकर यांनी केली आहे.
ऐन पावसाळ्यात जीर्ण झालेल्या पुलावर केबल टाकण्यासाठी परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी.
-दिनेश कोळेकर, नगरसेवक
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!