Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : रेल्वे पोलिसांमुळे दीड वर्षाच्या मुलीला मिळाला आधार

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरी रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि.२९) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास प्लॅटफार्म नंबर दोन वरील एका कॅन्टीन जवळील बाकड्यावर पिवळ्या रंगाच्या शॉलमध्ये लपेटलेल्या अवस्थेत एक वर्षाची मुलगी बेवारस सोडुन कोणीतरी अज्ञाताने पलायन केले.

दरम्यान पहाटे गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना ही बालिका रडताना दिसली म्हणून त्यांनी आजुबाजुला चौकशी केली. मात्र कोणीही पालक समोर आले नाही. त्यामुळे या जवानांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन या बालीकेस ताब्यात घेतले.

लोहमार्ग सहायक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पीएसआय मुरारी गायकवाड, पोलीस हवालदार सतिश खर्डे, हेमंत घरटे, दिपक निकम यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या बालिकेस तपासले असता मारहाण झाल्याच्या खुणा दिसल्याने तिस उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान बालिकेची प्रकृती ठीक झाल्यानंतर साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर यांनी या मुलीला नवीन ड्रेस दिला. यानंतर तिला नाशिकच्या बाल सुधारगृहात रवाना केले. या घटनेचा अधिक तपास सुरु असुन पुढील तपास रेल्वे पोलिस करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!