Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : आ. गावितांचा आज शिवसेना प्रवेश

Share

इगतपुरी : काँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला गावित यांचा शिवसेना प्रवेशासाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला आहे.

आज दुपारी 4 वाजता मुंबई येथील ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती दस्तुरखुद्द आ. गावित यांनी दिली.इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून सलग दोनदा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या काँग्रेसच्या आमदार गावित यांनी आता या प्रवेशाद्वारे विजयाच्या हॅट्ट्रिकची तयारी सुरू केली आहे.

त्या काँग्रेसकडून निवडणूक लढणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आ. गावित यांनी शिवबंधन बांधल्यास इगतपुरी- त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!