Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : त्रिंगलवाडी धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणी गळती

Share

इगतपुरी । तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील धरणाला गेल्या दोन वर्षापासुन गळती लागल्याने बंधारा कमकुवत झाला असुन रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे घोटी शहरासह सुमारे सहा ते सात गावांना होणारा पाणीपुरवठयाचे प्रमाण कमी झाल्याने त्रस्त ग्रामस्थांनी बलायदुरी ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वात तहसिलदार अर्चना भाकड यांना दि. १८ रोजी निवेदन देत धरण गळती बाबत माहिती दिली.

१९७२ सालात बांधण्यात आलेल्या धरणातुन घोटी शहरासह सुमारे ७ गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र बंधाऱ्याच्या भिंती जवळील मोरीचे झाकण तुटल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत असुन मे महीन्या पर्यंत धरण रिकामे होत असल्याने ग्रामस्थांनी अनेकदा लघुपाटबंधारे विभाग व जलप्राधिकरण विभागाला कळवुन सुध्दा त्यांनी लक्ष दिले नाही. आज या धरण गळतीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना शेतीला व गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढली असुन ऐन नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची समस्या भेडसावत आहे.

याकडे शासनाने वेळीच लक्ष देवुन बंधाऱ्याची गळती थांबविली नाही तर सुमारे ७ गावांच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. या बाबत तहसिलदार अर्चना भाकड यांनी तातडीची जलप्राधिकरण व लघुपाटबंधारे विभागाच्या संबधीत अधिकारींची बैठक घेवुन सदर समस्या सोडवावी अन्यथा ग्रामस्थ जनअंदोलन करतील असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला.

यावेळी बलायदुरीचे ग्रामसेवक चेतन पवार, सरपंच कैलास भगत, पोपट भंडारी, अशोक पवार, कृष्णा चव्हाण, काळु गटकळ, देवराम भगत, अशोक गटकळ, बाळु गटकळ, रामदास भगत, अरूण भगत, निवृत्ती भगत, पांडुरंग गटकळ, रामचंद्र कोकणे, लवेश दुभाषे, सुरेश करवर, आदिंनी निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!