Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : कर्जबाजारीपणाला कंटाळून कावनईत शेतकऱ्याची आत्महत्या

Share

कावनई : नापिकी, अतिवृष्टीव कर्जबाजारीपणाला कंटाळून कावनई येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविण्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की,इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील जयवंत पांडुरंग शिरसाट (वय ४६) या शेतकऱ्याने घोटीतील एका खाजगी बँकेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते तसेच शेतीकरिता ट्रॅक्टरही कर्जाने घेतला होता. मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरसाट यांच्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करणे मुश्किल झाले होते. यामुळे व्यथित झालेल्या जयवंत शिरसाट याने आज पहाटेच्या सुमारास गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना घोटीच्या रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान शासनाने त्यांच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी घोटीचे उपसरपंच संजय आरोटे यांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!