Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : अज्ञात चोरट्यांची नागरिकांना भुरळ घालत लाखोंची लूट

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
घोटी शहरात वेगवेगळ्या घटनांतून एकाच आठवड्यात नागरिकांना भुरळ घालत लाखो रुपये किमतीचे सोने लुटून नेल्याच्या घटना घडल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.

शहरातील सप्तशृंगी नगर येथील नागरिक सुनील पहाडीया हे आपल्या दुचाकीवर सकाळी वासुदेव चौकातील जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करुन परत घराकडे निघाले असता त्यांची दुचाकी चालू झाली नाही. दुचाकी चालू होत नसल्याने तितक्यात अज्ञात व्यक्तीने पाठी मागुन आवाज देत ‘अंकल रुको मै चालू करके देता हु’ असे म्हणत मदतीच्या बहाण्याने वाहन चालू करून दिले, दरम्यान त्याचवेळी सबंधित अज्ञात व्यक्तीने भुरळ अथवा रसायनाचा वापर करत, अज्ञात व्यक्तीने त्यांना त्यांच्याच दुचाकीवर बसवत घोटी ग्रामीण रूग्णालय येथील साई मंदिरात सोडले.

श्री. पहाडीया हे काही वेळाने शुद्धीवर आले असता आपली लुट झाल्याचे लक्षात आले. मात्र ते पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांपुढे काही एक सांगता आले नाही. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांनी आपल्या कर्मचारी यांना तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी सांगितले, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये श्री.पहाडे हे अज्ञात व्यक्ती बरोबर जात असल्याचे प्रथम दर्शनी दिसले, सबंधित अज्ञात व्यक्तीने तोंडाला मास्क लावलेला असल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन व दोन अंगठ्या असे एकूण एक लाख सत्तावन्न हजार रुपये कीमतीचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने पळविले.

दिवसा ढवळ्या आणि त्यातही गर्दीच्या ठिकाणी असे धाडस केले आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीची चोरी झाली ती व्यक्ती हा चोरट्यांच्या आहारी जातोच कसा? भान हरपणे, रसायनाचा वापर करणे, संमोहन करणे याचा अर्थ चोरटे अत्यंत सराईत गुन्हेगारी प्रवृत्तिचे आहेत. पोलिसांपुढे अशा घटना आव्हानात्मक असुन अशा घटनांचा वापर धोकादायक वळणावरून जात असल्याने नागरिकांत घबराट होणे स्वाभाविक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!