Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

Share

कावनई : तालुक्यातील काळूस्ते जवळील दरेवाड़ी येथे प्रेयसीकडून लग्नाचा तगादा कायम होत राहिल्याने प्रियकराने तगादयाला त्रासुन आपल्या चुलत्याच्या मदतीने प्रेयसीची दगड़ाने ठेचुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रियकर व त्याच्या चुलत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.तसेच संशयितानी गुह्याची कबूली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत वृत्त असे की दरेवाड़ी (काळूस्ते,) येथील अंगणवाडी मदतनिस म्हणून काम करणारी सविता सनू पारधी हि विवाहित असली तरी घटस्फोट झाल्याने ती माहेरीच दरेवाड़ी येथे राहत होती तीचे वाडीतिलच दीपक चीमा गिरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यातच या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र दीपक याचे वय कमी असल्याने वर्षभरानंतर लग्न करण्याची हमी देण्यात आली होती.

दरम्यान (दि. १३) रोजी सविता पारधी ही अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातलगांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे तीच्या आई वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार इगतपुरी पोलिसात दिली होती. काल रविवार रोजी भाम धरणाच्या वरील बाजूस एका निर्जन स्थळी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला असून त्याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना दिली. तपासाअंती हा मृतदेह दरेवाड़ी येथील बेपत्ता असलेल्या सविता पारधी हिचा असल्याचे निष्पन झाले.

याबाबत पोलिसांनी संशयित म्हणून दीपक चीमा गिरे व त्याचा चुलता पूना सोमा गिरे यांना ताब्यात घेतले. त्यांनी सविता हिच्याकड़ून होणारा लग्नाचा तगादा असहय झाल्याने तसेच या लग्नाला विरोध असल्याने तिला दगड़ाने ठेचुन मारून तिचा मृतदेह दुचाकीवरुन निर्जन स्थळी फेकून दिल्याची कबूली दिली.

दरम्यान आज घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर, यांच्यासह प्रभारी उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, इगतपुरीचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, आदिंनी घटनास्थळी भेट दिली. अप्पर अधीक्षक श्रीमती वालवलकर यांनी तपासकामी उपयुक्त सूचना दिल्या. उपनिरीक्षक आनंदा माळी, हवालदार धर्मराज पारधी ,शीतल गायकवाड़, लहू सानप आदिंनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!