Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : चाळीस वर्ष जुन्या भाजी मंडईला अखेर मुहूर्त; लवकरच बांधकामाला सुरवात

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरी नगरपरिषदेने १९७९ साली शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये तसेच या शहरात एकही सभागृह नसल्याने नगरपरिषदेने मध्यवर्ती ठिकाणी दोन मजली छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई व डॉ. बाबासाहेब सभागृह अशी ही इमारत बांधली होती.

ही इमारत ४० वर्ष जुनी झाल्याने या इमारतीचा काही भाग मोडकळीस आलेला आहे. तसेच ही इमारत पावसाळ्यात पुर्णत गळत असल्याने ही इमारत नगरपरिषदने धोकादायक ठरवुन येथे व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी नोटीस बजावुन सर्वांना नगरपरिषद कार्यालयात बोलावून समज देण्यात आली.

इमारत पुर्णत: तकलादू झाली असल्याने केव्हाही पडु शकते म्हणुन ही इमारत पाडुन त्याच ठिकाणी इमारतीचे डिमॉलीश करून नवीन इमारत बांधने कामी येथील भाजीपाला विक्रेत्यांचे तात्पुरते पुनर्वसन महात्मा गांधी हायस्कूल जवळील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत करण्यात आले आहे.

त्या ठिकाणी व्यावसाय करावा. त्याच प्रमाणे नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर सदर गाळ्याचे लिलाव करण्यात येऊन गाळेधारकांना दिले जातील असे आवाहन मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले असुन त्यास गाळेधारकांनी मान्यता दिली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!