Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी रेल्वे स्थानकासमोरील एटीएमला आग

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
मध्यवर्ती रेल्वे स्थानका समोरील असलेल्या अँक्सिस बँकेच्या एटीएम मशिनच्या रूममधे (दि.२) सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. यावेळी शेजारी असलेले कापड विक्रीचे दुकान व हॉटेल मधील ग्राहक तसेच प्रवाशांची एकच धांदल उडाली.

यावेळी घटनास्थळावर उभे रिक्षा व टॅक्सी चालक यांनी आग विझविण्यास मदत केली. इगतपुरी नगरपरिषदेची अग्निशामक दलाची सेवा पथक घटनास्थळी दाखल झाल्याने थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान ए. टी. एम रूमच्या आतील वातानुकुलित यंत्राच्या शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वीज विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ही खाजगी मालमत्ता असल्याचे सांगुन त्यांनी बँकेच्या खाजगी वायरमन अजीम शेख यांच्या देख रेखीत पहाणी केली असता केवळ वातानुकुलीत यंत्र जळुन खाक झाले.

यात एटीएम मशीन सह त्या मधील रोकड रक्कम सुरक्षित आहे. आग लागल्याचे कारण व अधिक तपास ऑक्सिस बँकचे अधिकारी व तपास कर्मचारी करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!