Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : निर्मला गावित यांचा पिक पाहणी दौरा; नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन

Share

आहुर्ली/घोटी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला असुन भात पिकासह नागली, वरई आदी खरिप पिकाचें प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच माव्याचा प्रादुर्भाव भात पिकांसह खरिप पिकांवर झाला असुन तातडीने भातासह खरिप पिके कापणी करणे गरजेचे असतानांच परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने पिके मातीमोल झाली आहेत.

सर्वत्र सडलेली खरिप पिके व नुकसान दिसत असुन अत्यंत करुण व बिकट चित्र दिसल्याचे नमुद करत प्रशासनाने तातडीने शेतावर, बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करावेत व सरसकट नुकसान भरपाई जाहिर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार सौ निर्मला गावित यांनी केली आहे.

माजी आमदार सौ निर्मला गावित यांनी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आहुर्ली परिसरातील रायांबे, कर्होळे, सातुर्ली, आवळी, आहुर्ली, वांजोळे, शेवगेडांग, म्हसुर्ली, पहिणे, पेगलवडी आदी गावासंह वाडी पाडयावर जाऊन खरिप पिक नुकसानीची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशीं चर्चा करुन शेतकऱ्यांचें अश्रु पुसले त्यांना दिलासा दिला आहे.

परिसरात एकिकडे मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे खरिप पिक उध्वस्त होत आहे. माव्या पासुन पिक वाचवायचे तर तातडीने कापणी करणे गरजेचे आहे. तसेही खरिप पिके कापणीयोग्य झालीच आहे. मात्र पिके कापावी तर पावसामुळे नुकसान व न कापावे तरीही नुकसानच अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.

शेतातच उभी पिके सडत असुन डोळ्यासमोर नुकसान होऊनही हतबल शेतकरी पाहण्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही असा दुर्धर प्रसंग या वेळी शेतकऱ्यांवर कोसळला आहे. दरम्यान यंदा पावसामुळे नुकसान होऊन दाण्यानां छाप लागुन काळे पडण्याची साधार भिती व्यक्त होत असुन या मुळे कसेबसे हातात पडणारे हे भात विकणे व खाणे योग्य ही राहणार नाही. एकुणच शेतकर्याचे सर्वथा नुकसान झाले आहे.

या वेळी माजी आमदार निर्मला गावित यांनी सांगितले कि, नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर शिवसेना पदाधिकारी व गावचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ
दरम्यान यंदा सातत्याने पडणार्‍या पावसाने भात पिकासह खरिपाचे उतारालाही मार दिला असुन त्यात मावा रोगाने भर टाकली आहे. माव्या पासुन कापणी योग्य पिक कापावे तर परतीच्या पावसामुळे या पिकाचें नुकसान व न कापावे तरी सडव्याचा धोका या दुहेरी कात्रीत यंदा शेतकरी सापडला आहे. यामुळे शेतकरी उध्वस्त झाला असुन आत्महत्येशिवाय त्याचे कडे पर्याय उरला नाही. शासनाने उध्वस्त शेतकऱ्यांना तातडीने सावरावे.
-रमेश धांडे, उप तालुका प्रमुख (शिवसेना, इगतपुरी)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!