Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर कार व गॅस टँकरचा भीषण अपघात; दोन ठार

Share

इगतपुरी । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबायला मागत नाही आहे. दररोज कुठे ना कुठे भिषण कींवा किरकोळ अपघात होतांना दिसतच आहेत.

दरम्यान आज पुन्हा सकाळी नऊ वाचेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळील महामार्गावरील हॉटेल परिवार गार्डन समोरच मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या एका गॅस टँकरला पाठीमागून आलेल्या भरधाव कार क्र. RJ.19.TA.8005 ने जोरदार धडक दिल्याने दोन जनांचा जागीच मृत्यु झाला.

हा अपघात इतका भयानक होता की, या कारमधील एका महिलेचे शिरच ( मुंडके ) धडावेगळे होऊन कारच्या मागील बाजूस डिक्कीच्या काचेला अडकुन पडले आहे. यावरुन अंदाज येतो की, या कारचा वेग किती असेल.

परंतु या अपघातात कारचालकाला डुकली आल्याने त्याचा कार वरील नियंत्रण सुटल्याने कार सरळ गॅस टँकरला पाठीमागुन धडकली. हा अपघात इतका भयानक झाला की कारचा पुर्ण चक्काचुर झाला. या घटनेचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!