Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

बेलगाव कुऱ्हे येथे शॉटसर्किटमुळे गवत जळून खाक

Share

बेलगाव कुऱ्हे । लक्ष्मण सोनवणे : तालुक्याच्या पूर्वभागात जनावरांना पिण्याचे पाणी व चाराटंचाई समस्या उग्ररूप धारण करीत असतांना वाडीवऱ्हे येथील विजवितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे बेलगाव कुऱ्हे येथील शेतातील गवत शॉटसर्किटमुळे जळून खाक झाले आहे. परिसरातील काही शेतकऱ्यानी पाणीटंचाईवर मात करीत पशुधनासाठी शेतीद्वारे चाऱ्याची सुविधा केली आहे, मात्र चारा जळून गेल्याने मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

येथील शेतकरी भीमा गुळवे यांच्या वस्तीतील गवत विद्युत तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने मोठी आग निर्माण होऊन गवत जळून खाक झाले आहे. काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली.

सदर आग लागल्याने गुळवे यांनी आरडाओरड करताच ग्रामस्थ धावून आल्याने प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला. शेतीच्या क्षेत्रात जनावरांसाठी चारा व्यवस्था केली होती. त्यातील चार ट्रॅक्टर गवत आगीत जळून गेल्याने मोठे नुकसान झाले.

बेलगाव कुऱ्हे परिसरात विद्युत पोल वाकलेले असल्याने तेथे विद्युत तारा हाताला लागतील अशा लोंबलेल्या आहेत, त्यामुळे जीवितास हानी देखील आहे. विद्युत पोल कोसळण्याच्या मार्गावर असून ते तात्काळ बदलावे अशी मागणी असताना विजवीतरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. आग विझविण्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते नंदराज गुळवे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ गुळवे , सोमनाथ मांडे, रंगनाथ ठाणगे, ज्ञानेश्वर गुळवे, गोरख बोराडे, संतोष गुळवे, संदीप बोराडे, दीपक गुळवे, नामदेव गुळवे, संपत गुळवे, सूर्यभान गुळवे, रवी गुळवे, अतुल गुळवे, भगवान गुळवे तसेच महिलांनी सहभाग घेतला.

मोठ्या मेहनतीने पाणीटंचाईवर मात करीत जनावरांसाठी गवत साठवलेले होते. मात्र त्यातील काही चारा विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे जळून गेला आहे. तलाठी देखील पंचनामा करण्यास आले नाही. नुकसान भरपाई तात्काळ मिळावी. परिसरातील अतिशय जीर्ण, वाकलेले, गंजलेले पोल तात्काळ बदलवावे जेणेकरून काही अनर्थ होऊ नये.
-नवनाथ गुळवे , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!