Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : महावितरणच्या हद्दवादात आळवंडी धरणाची दोन महिन्यांपासून बत्ती गुल; जनरेटरद्वारे विसर्ग

Share

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आळवंडी धरणावर गेल्या एक महिन्यापासून वीज गायब असून जनरेटरवर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान धरण परिसरात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तसेच दोन दिवसांपासून धरणांतून विसर्गही करण्यात येत आहे. या धरणांवर गेल्या महिनाभरापासून वीज गायब असल्याने जनरेटरद्वारे विसर्ग करण्यात येत आहे.

तसेच गेल्या दोन वर्षांपासून धरणावरील सीसीटीव्ही बंद असल्याने धरणाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी सांगितले. वीज गायब असल्याने धरण अंधारात असून सीसीटीव्ही देखील बंद असल्याने ऐन पावसाळ्यात धरण वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.

मागील महिन्यात झालेल्या पावसात धरणांवरील डीपी नादुरुस्त झाली. परिणामी घोटी येथील वीज वितरण मंडळात संपर्क केला असता दुरुस्तीचे साधन नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संपर्क केला असता दोन दिवसात येतो असे सांगत आल्याचे टाळले. पुन्हा संपर्क केल्यानंतर आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत टाळाटाळ केली. दरम्यान अजूनही पाठपुरावा करत असून लवकरच काम होईल अशी अपेक्षा आहे.
-निलेश वनेरे, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!