Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : काळूस्ते येथील भाम धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Share
इगतपुरी : शेताकडे जाण्यासाठी नदी पार करतांना नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन भाम धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. राजू वारे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. मागील वर्षी  याच ठिकाणी एकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता
दरम्यान आज सकाळी राजु वारे नेहमीप्रमाणे शेतात जाण्यासाठी निघाले असता वाट नसल्याने दोरीच्या सहाय्याने नदी पार करतांना हा अपघात घडला. येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास घारे यांनी ही माहिती सांगितली.
सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने तरुणाचा मृतदेह शोधण्यास अडथळा निर्माण झाला आहे.  या घटनेची माहिती घोटी पोलीस ठाण्यात कळवण्यात आले असून पुढील तपास घोटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!