#IFFI : … आम्ही मात्र आमचा चित्रपट घेऊन जाणार : निर्माता-दिग्दर्शक योगेश सोमण

0

‘न्यूड चित्रपट वगळला गेल्यामुळे इफ्फीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आम्ही मात्र आमचा चित्रपट ‘माझं भिरभिरं’  घेऊन तेथे जाणार आहोत,’ अशी माहिती  निर्माता-दिग्दर्शक योगेश सोमण यांनी दिली.

रवी जाधव यांचा चित्रपट वगळला गेल्याचे समजल्यानंतर विविध क्षेत्रांतून त्या निर्णयाविरोधात प्रतिकिया येत आहे.

इफ्फीवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र सोमण यांनी त्याला विरोध केला आहे. ‘चित्रपट महोत्सवामध्ये आपल्या चित्रपटाची निवड होणे आणि तो दाखविला जाणे याचा आनंद मोठा असतो.

यंदाच्या इफ्फीमध्ये ‘माझं भिरभिरं’ हा माझा चित्रपट निवडल्याचा आनंद साजरा करण्याआधीच दोन चित्रपट वगळल्याने वाईट वाटत आहे. महोत्सवावर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले गेले; परंतु आम्ही महोत्सवाला जाणार आहोत.’ अशी माहिती सोमण यांनी दिली.

LEAVE A REPLY

*