#IFFI : ज्युरींसमोर होणार एस. दुर्गाचे स्क्रीनिंग

0

एस. दुर्गा चित्रपटाचे अखेर इफ्फीमध्ये स्क्रीनिंग होणार आहे.

आज संध्याकाळी खास ज्युरींना हा चित्रपट दाखवण्यात येईल.

गोव्यात 48 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु होण्याआधीच एस.दुर्गा आणि न्यूड या दोन चित्रपटांच्या स्क्रीनिंगवरुन मोठा वाद झाला होता.

मागच्या आठवडयात केरळ उच्च न्यायालयाने ‘एस. दुर्गा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हिरवा कंदिल दाखवला होता.

उच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांना इफ्फीमध्ये ‘एस दुर्गा’चा समावेश करुन या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांनी ‘एस. दुर्गा’ च्या स्क्रीनिंगवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले. सनल कुमार शशीधरन यांनी एस दुर्गा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

 

LEAVE A REPLY

*