पत्राची दखल घेतली असती तर वाचले असते मुलीचे प्राण

0
नाशिक | महिरावणी येथे सोमवारी संदीप विद्यापीठाची विद्यार्थिनी प्राजक्ता सुर्वे हीचा अपघातात मृत्यू झाला. या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा गतिरोधक तयार करण्यात यावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. परंतु या पत्राला नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली. आज ही मागणी मान्य झाली असती तर त्या मुलीचे प्राण वाचू शकले असते.

संदीप विद्यापीठातून नाशिक येथे येणार्‍या विद्यार्थनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय बाहेरील वाहनांची रहदारीही या बाजूला जास्त आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला 22 सप्टेंबरला पत्र देऊनही त्यांनी या पत्राकडे लक्ष देण्यात आले नाही. या पत्रात भुयारी मार्गासह , गतीरोधक तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठाकडेही सहकार्याची मागणी करण्यात येईल असे म्हटले आहे.

परंतु सर्वर्जानिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे आपली उदासीनता कायम ठेवत या पत्राकडे साफ दुर्लक्ष केले. या कामाकडे लक्ष दिले असते तर आज अपघातात सदर मुलीला आपला जीव गमवावा लागला नसता. दरम्यान यापूर्वी देखील स्थानिक नागरिक व विविध संघाटंकडून या ठिकाणी गतिरोधक तसेच भुयारी मार्ग करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. लवकरात लवकर याठिकाणी भुयारी मार्गाचा विचार करण्यात यावा अशी मागणी मनिषा पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*