अक्षय म्हणतो, शौचालय नसेल त्याच्याशी विवाह करू नका

0
लंडन | अक्षय कुमारचा बहुचर्चित टोयलेट एक प्रेम कथा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज लंडनमधून अक्षय कुमारने १७ मिनिटांचे फेसबुक लाइव्ह करून या चित्रपटाचे लंडनच्या टक्सीमधून प्रमोशन केले.

अक्षयसोबत यावेळी या चित्रपटातील नायिका भूमी आणि अनुपम खेर देखील होते. त्यांनीही यावेळी चित्रपटाबाबत माहिती देतांना सांगितले. ही एक जनजागृती करणारी टोयलेट एक प्रेमकथा असून नक्की बघावी. तसेच चित्रपट बघून जनजागृती देखील करावी असेही यावेळी त्यांनी सांगितले.

थोडक्यात चित्रपटाचे महत्वाचे पैलू त्यांनी नेटकरयांशी शेयर केले. तसेच यावेळी अक्षय म्हणाला की, ज्या घरात टोयलेट नाही अशा घरात आपली मुलगी देऊ नका किंवा मुलीने असे विवाह करू नका असे म्हणत शौचालय आज काळजी गरज असून जनजागृतीशिवाय प्रत्येक घरापर्यंत शौचालय पोहोचणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जेव्हा अक्षयने आपल्या फेसबुकपेजवरून या चित्रपटाचे प्रमोशन केले तेव्हा हा व्हिडीओ एका मिनिटामध्ये  लाखो लोकांनी पहिला तसेच अनेक कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात होता.

 

LEAVE A REPLY

*