Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 'या' ताखेपासून

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘या’ ताखेपासून

नाशिक | Nashik

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लेखी परीक्षा ५ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत.

- Advertisement -

काउन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेस एक्झामिनेशनने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही इयत्तांचे तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या म्हणजेच आयएससी बोर्ड परीक्षा ८ एप्रिल २०२१ पासून सुरू होणार आहेत. मुख्य थिअरी परीक्षा ५ मे २०२१ पासून सुरू होतील. तत्पूर्वी ८ एप्रिलला कॉम्प्युटर सायन्स पेपर – २ चे प्रॅक्टिकल-प्लानिंग सेशन असेल आणि ९ एप्रिल रोजी होम सायन्स आणि इंडियन म्युझिक पेपर – २ चे प्रॅक्टिकल्स होतील. ५ मे रोजी बिझनेस स्टडीज विषयाच्या पेपरसह ही परीक्षा सुरू होईल.

बहुतांश पेपर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात होणार आहेत. काही पेपर्सची परीक्षा सकाळी ९ वाजल्यापासून असेल. बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षा ५ मे पासून सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी भाषा पेपर १ ची परीक्षा असेल.

यासाठी २ तासांचे वेळ असेल. दहावीचे बहुतांश पेपर सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होतील. काही पेपरची परीक्षा सकाळी ९ पासून सुरू होईल. परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या