Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

‘कुलभूषण जाधव’ प्रकरणी भारताचा मोठा विजय; फाशीला स्थगिती

Share

द हेग | वृत्तसंस्था

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.

जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाय त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीदेखील देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. द हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली.

मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी निकाल वाचन केला. याप्रसंगी त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पाकिस्तानने पुनर्विचार करावा असे म्हटले आहे.

दरम्यान कुलभूषण जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात यशस्वीपणे हाताळल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी वकील साळवे यांचे आभार मानले. तर राजनाथ सिंग यांनी भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!