#ICCWomensWorldCup2017 : ‘हा माझा शेवटचा विश्वचषक होता, पुढच्या विश्वचषक संघात मी नसेन’ : कर्णधार मिताली राज

0

लॉर्डसवरच्या फायनलमध्ये यजमान इंग्लंडनं भारतावर मात करून चौथ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

कर्णधार मिताली राज हिने क्रिकेट कारकिर्दीतील पुढील वाटचालीबाबतचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

ही आपली शेवटची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होती. आता पुढच्या विश्वचषकात मी भारतीय संघाचा भाग नसेन असे मितालीने सामना संपल्यानंतर सांगितले.

या सामन्यानंतर आपण पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचं टीम इंडियाची कर्णधार मिताली राजनं स्पष्ट केलं आहे. सामना संपल्यानंतर मिताली म्हणाली की, ‘हा माझा शेवटचा विश्वचषक होता. पुढच्या विश्वचषक संघात मी नसेन.’ दरम्यान, असं असलं तरी मितालीनं अद्याप तिच्या निवृत्तीबाबत किंवा कर्णधारपद सोडण्याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.

 

LEAVE A REPLY

*