#ICCWomensWorldCup2017 : भारतीय महिला संघ न्यूझीलंडला पराभूत करून 17 वर्षांनंतर उपांत्य फेरीत

0
विश्वविक्रमीवर मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी अायसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
भारतीय महिलांनी सामन्यात न्यूझीलंडवर १८६ धावांनी शानदार विजय संपादन केला.
भारतीय महिलांचा ३९ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धचा हा सर्वात माेठा विजय ठरला.
यापूर्वी १९७८ मध्ये भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला हाेता.
यासह भारतीय संघाने (२०००) १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम चारमध्ये प्रवेश केला. अाता गुरुवारी भारताचा उपांत्य सामना अाॅस्ट्रेलियाशी हाेणार अाहे.
सामनावीर राजेश्वरी गायकवाडच्या (५/१५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय महिलांनी अवघ्या २५.३ षटकांत सामना जिंकला.

LEAVE A REPLY

*