Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

आयसीसी विश्वचषक टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

Share

मुंबई | प्रतिनिधी

इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पलेल्या ५० षटकांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर आता पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये २० ष्टकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत.

३१ डिसेंबर २०१८ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी टी २० क्रमवारीतील अव्वल ८ संघाना थेट प्रवेश देण्यात आला आहे. या संघांमध्ये भारत , ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, विंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका हे आठ संघ मुख्य फेरीत असतील तत्पूर्वी पात्रता फेरी खेळवली जाणार आहे. यात आयर्लंड , बांगलादेश , श्रीलंका , झिम्बाब्वे याव्यतीतिरिक्त ग्लोबल लीगमधील इतर संघांचा समावेश असणार आहे.

या पात्रता फेरीत दोन गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात अली आहे. या दोन्ही गटातील अव्वल दोन संघ मुख्य फेरीत खेळतील पण यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान प्रथमच विरुद्ध गटात आहेत. परंतु, २००७ च्या विश्वचषकाप्रमप्रमाणे हे दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार का ? अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आतापासूनच जोर धरू लागली आहे. दोन्ही मुख्य गटांमधील अव्वल दोन संघ उपांत्य सामन्याकरता पात्र ठरतील पहिला उपांत्य सामना ११ नोव्हेंबर दुसरा उपांत्य सामना १२ नोव्हेंबर अंतिम सामना १५ नोव्हेंबरला होईल.

अशी आहे गटविभागणी

गट अ                              गट ब

पाकिस्तान                        भारत
ऑस्ट्रेलिया                        इंग्लंड
न्यूझीलंड                   दक्षिण आफ्रिका
विंडीज                         अफगाणिस्तान

गट अ विजेता गट ब विजेता

गट ब उपविजेता गट अ उपविजेता

असे आहे स्पर्धेचे वेळापत्रक

१. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान २४ ऑक्टोबर

२. भारत विरुद्ध आफ्रिका २४ ऑक्टोबर

३. गट अ विजेता विरुद्ध गट ब उपविजेता २५ ऑक्टोबर

४. न्यूझीलंड विरुद्ध विंडीज २५ ऑक्टोबर

५. अफगाणिस्तान विरुद्ध गट अ उपविजेता २६ ऑक्टोबर

६. इंग्लंड विरुद्ध गट ब विजेता २६ ऑक्टोबर

७. न्यूझीलंड विरुद्ध गट ब उपविजेता २७ ऑक्टोबर

८. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडीज २८ ऑक्टोबर

९. भारत विरुद्ध गट अ उपविजेता २९ ऑक्टोबर

१०.  इंग्लंड विरुद्ध आफ्रिका ३० ऑक्टोबर

११.  विंडीज विरुद्ध गट ब उपविजेता ३० ऑक्टोबर

१२.  पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ३१ ऑक्टोबर

१३. ऑस्ट्रेलिया विरुद्ध गट अ विजेता ३१ ऑक्टोबर

१४.  भारत विरुद्ध इंग्लंड १ नोव्हेंबर

१५.  गट अ उपविजेता विरुद्ध गट ब विजेता २ नोव्हेंबर

१६.  पाकिस्तान विरुद्ध विंडीज ३ नोव्हेंबर

१७.  ऑस्ट्रेलिया विरुद्ध गट ब उपविजेता ३ नोव्हेंबर

१८ . इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान ४ नोव्हेंबर

१९. आफ्रिका विरुद्ध गट अ उपविजेता ५ नोव्हेंबर

२०. भारत विरुद्ध गट ब विजेता ५ नोव्हेंबर

२१. पाकिस्तान विरुद्ध गट ब उपविजेता ६ नोव्हेंबर

२२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड ६ नोव्हेंबर

२३. इंग्लंड विरुद्ध गट अ उपविजेता ७ नोव्हेंबर

२४. विंडीज विरुद्ध गट अ विजेता ७ नोव्हेंबर

२५. आफ्रिका विरुद्ध गट ब विजेता ८ नोव्हेंबर

२६. भारत विरुद्ध अफगाणिस्तान ८ नोव्हेंबर

२७. पहिला उपांत्य सामना ११ नोव्हेंबर

२८. दुसरा उपांत्य सामना १२ नोव्हेंबर

२९. अंतिम सामना १५ नोव्हेंबर

सलील परांजपे, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!