#ICC : आयसीसीचा संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंना स्थान, धोनी बाहेर

0

आयसीसीने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2017’ ची टीम जाहीर केली आहे.

या संघाचं नेतृत्त्व पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदकडे देण्यात आलं आहे. सोमवारी या संघाची घोषणा करण्यात आली.

या संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचाच समावेश झाला आहे.

दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी किंवा हार्ड हिटर हार्दिक पांड्या, रोहित शर्मा हे या संघात स्थान मिळवू शकले नाहीत. 

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स, आदील राशिद आणि ज्यो रुट यांचा समावेश झाला आहे. तर बांगलादेशच्या तमीम इकबालनेही आयसीसीच्या संघात प्रवेश केला.

आयसीसीच्या चॅम्पियन्स संघाची निवड इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल एथर्टन, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा, क्रिकेट पत्रिका विज्डन अल्मानकचे संपादक लॉरेन्स बूथ आणि वृत्तसंस्था एएफपीचे क्रिकेट पत्रकार ज्युलियन गुयेर यांच्या समितीने केली. या समितीचे अध्यक्ष आयसीसीचे महाव्यवस्थापक जॉफ अलाडाईस होते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संघ:  सरफराज अहमद (पाकिस्तान, कर्णधार/विकेटकीपर), शिखर धवन (भारत), फखर झमान (पाकिस्तान), तमीम इकबाल (बांगलादेश), विराट कोहली (भारत), ज्यो रूट (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), आदील राशिद (इंग्लंड), जुनैद खान (पाकिस्तान), भुवनेश्वर कुमार (भारत), हसन अली (पाकिस्तान), केन विल्यमसन (12वा खेळाडू,न्यूझीलंड).

LEAVE A REPLY

*