Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

नाशिकवर माझे प्रेम; सुंदर कामं करायला मला आवडतात – राज ठाकरे

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक मनसेनेचा बालेकिल्ला होता, मनसेने नाशिककरांना दिलेला शब्द सार्थ ठरवत विकासाची गाडी हाकली. आजही नाशिकमध्ये एक खड्डा शोधून सापडणार नाही. रतन टाटा, रिलायन्स सारख्या कंपन्यांना नाशिकमध्ये बोलवून त्यांना विकासात सहभागी करून घेतले. अनेक महात्वाकांशी प्रकल्प मनसेने राबवले, आज त्याच चीज झालेले दिसते. एव्हढ करूनही जो काम करतो तो बाजूला, जो काहीच करत नाही त्याच्या हाती सत्ता देऊन  ठेवली आहे. माझे नाशिकवर प्रेम आहे, सुंदर कामं करायला मला आवडतात असे म्हणत मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकवरचे प्रेम व्यक्त करून दाखवले.

राज म्हणाले, अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र थंड झालाय हेच कळत नाही. 14 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या तरी आपण थंड, कामगार देशोधडीला लागला तरी तुम्ही थंड, या शासनाने 5 वर्षात वाटोळे केले तरी तुम्ही थंड, 32 वर्षात झाला नाही इतका नाशिकचा विकास आम्ही 5 वर्षात केला.

राज ठाकरे यांची नाशिकमधून LIVE सभा

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये LIVE सभा

Posted by Deshdoot on Wednesday, 16 October 2019

तुमच्या खिशाला भुर्दंड नको म्हणून बाहेरील उद्योजक आणुन विकास केला. तरी आपण मला पराभव दिलात तो माझ्या जिव्हारी लागला. यामुळे मी काहीसा शांत झालो. हे आता तुम्हाला ओरबडतायेत तरी तुम्हाला त्यांचेच शासन हवे, नेमके तुम्हाला हवे तरी काय ते तरी मला कळू द्या.

जम्मु काश्मिरचे कलम 370 रद्द केले ही चांगलीच बाब आमचा याबाबत पाठिंबाच आहे. जम्मु काश्मिर हा भारताचाच आहे. परंतु 370 कलम रद्द झाल्याने किती काश्मिरी पंडितांनी घरवापशी केली याचेही आकडेवारी द्या. त्या राज्याचाही चांगला विकास झाला पाहिजे. पंरतु इकडे महाराष्ट्र ओस पडत चाललाय त्याचेही काही तरी करा.

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये LIVE सभा

Posted by Deshdoot on Wednesday, 16 October 2019

शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले. यांनी नेमकी फुले कुठे वाहिली ती तरी पहा. मुळात स्मारके करणे, पुतळे उभे करणे मला पटत नाही. त्यापेक्षा शिवाजी महाराजांचा चालता बोलता इतिहास सांगणार्‍या आमच्या किल्ल्याचे जतन करा. तेच उद्या इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचवतील. इंदु मिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचेही तसेच. तेथे जगातील सर्वात मोठे वाचनालय उभारा. तेच बाबासाहेबांना अपेक्षीत होते. वाचा आणि लढा हे त्यांनीच शिकवले.


काही पुरूष गरोदर…

या जगात कोणाचे कोणावाचून काही आडत नाही. फक्त पुरूष गरोदर राहू शकत नाही अन्यथा सर्व करता येते सर्व मिळवता येत, परंतु काही पुरूष गरोदर असल्यासारखे दिसतात. या प्रकारे नाव न घेता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवताच संपुर्ण सभेत एकच हास्यकल्लोळ उडाला. तर तुम्ही कोणाला पाहिले असे ठाकारे यांनी विचारताच प्रेक्षकांमधून टरबुजा टरबुजा अशा आरोळ्या घुमल्याने ठाकरेंनाही हसु आवरता आले नाही.


हे ताट वाट्या घेऊन पळताहेत

सत्ताधारी भाजप सेनेवाले सध्या ताट वाटे घेऊन पळतायेत. एकाने 10 रूपयांत जेवन देणार म्हटले की, दुसरा 5 रूपयात जेवन देणार म्हणतोय. महाराष्ट्र काय इतका भिकेला लागलाय काय? असा टोला लगावत राज ठाकरे यांनी युतीच्या घोषणांचा समाचार घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!