Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरीजवळ तरसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी 

इगतपुरीजवळ तरसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. येथील महिंद्रा कंपनीजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. तरसाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

दरम्यान, भरधाव वाहनाच्या धडकेत तरसाच्या शरीरात अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. अतिरक्तस्राव झाल्याने तरसाचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!