हैद्राबाद अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

हैद्राबाद अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

हैद्राबाद | वृत्तसंस्था 

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचे एन्काऊंटर करण्यात आले. घटनास्थळी चारही आरोपींनी पोलिसांच्या बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न केला यानंतर हे एन्काऊंटर केल्याचा निर्वाळा पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.

या घटनेत चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळी नेल्यानंतर या आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेलंगणा पोलिसांनी चौघांचं एन्काऊंटर केलं. तेलंगणा पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला महिला डॉक्टरसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला जाळून दिले होते. यानंतर देशात प्रचंड संताप व्यक्त केला जात होता.

२७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि मदत करण्याच नाटक केले. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.

डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर जाळण्यात आले होते. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर आज त्यांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com