Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

हैदराबाद : ‘त्या’ घटनेतील चारही संशयितांना अटक; देशभरातून संतापाची लाट

Share

हैद्राबाद : हैद्राबाद येथील माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान प्रियांका रेड्डी नामक महिला डॉक्टरवर अत्याचार केल्यानंतर जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या कसून चौकशीनंतर चार आरोपीना अटक करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. यामध्ये पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये, यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली असल्याचे समोर आले आहे. तसेच पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. परंतु आरोपींनी आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवल्याने पीडित तरुणीचा गुदमरून मृत्यू झाला. बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला असून यामुळे देशभरात निषेधाचे फलक लागले असून कठोरातील कठोर शिक्षा आरोपीना व्हावी असे देशभरातून पोस्ट व्हायरल होत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!