Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हैदराबाद एन्काऊंटर चौकशी नगरी अधिकार्‍याकडे !

Share

हैदराबाद – येथील डॉक्टर तरुणीच्या अत्याचारातील आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार आहे. तेलंगाना सरकारने 8 सदस्यांच्या विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी महेश भागवत या पथकाचे प्रमुख आहेत.

हैदराबाद एन्काऊंटरविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मानव हक्क आयोगाने देखील याप्रकरणी चौकशी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने देखील अखेर एसआयटीची नेमणूक करत एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले. आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्याकडे चौकशी पथकाचे नेतृत्व असणार आहे. भागवत हे रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या काम करत आहेत. या टीमकडे एन्काऊंटरचा तपास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे महत्त्वाचे काम असणार आहे.

तेलंगाना उच्च न्यायालयात आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणी आज (9 डिसेंबर) सुनावणी सुरू आहे. तेलंगाना उच्च न्यायालयाने याआधीच हैदराबाद एन्काऊंटरमधील आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होऊपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) 7 सदस्यीय पथकाने बलात्कार झालेले ठिकाण आणि एन्काऊंटर झालेल्या स्थळाचीही शनिवारी (7 डिसेंबर) पाहणी केली. दरम्यान, तेलंगाना पोलिसांनी चारही आरोपींविरोधात चौकशी करताना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!