पैशांची गरज भागवण्यासाठी पत्नीचेच लग्न लावले

0
इंदिरानगर (प्रतिनिधी) : पैशाची गरज असल्याचे सांगून आपल्या पत्नीचा दुसऱ्या व्यक्‍तीबरोबर विवाह करून देणाऱ्या पतीसह त्याच्या नातेवाईकांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका महिलेचे अमोल भालेराव नामक युवकासोबत विवाह झाला होता. त्यानंतर अमोल हा काहीच कामधंदा करीत नसल्याने पत्नीने वारंवार त्याला नोकरी किंवा कामधंदा करण्यास सांगितले मात्र त्‍याने काम करण्यास नकार दिला.

त्यानंतर महिलेला तिचा पती अमोल हा सुरतवरून म्हैसाना येथे घेवून गेला. त्यावेळी सासू ललिता भालेराव, नणंद मयुरी हरीश उघाडे यांचेसह मयुरीचा मित्र नितीन सारवान, मेघा सोलंकी व गोपाळ सोलंकी, प्रिया व तिचा नवरा नागेश हे भेटले.

त्यानंतर हे सर्वजण पाली, राजस्थान येथील जैन भवनात गेले. तेथे विशाल जैन व त्यांच्या कुटूंबीयांकडे  महिलेच्या  लग्नासाठी दाखविण्याचा कार्यक्रम केला.

यावेळी सासू ही मावशी असल्याचे तर पती हा भाऊ व नणंद ही बहिण असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी विशाल जैन यांसोबत महिलेचा विवाह लावून दिला. त्यानंतर या महिलेने तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार विशाल जैन यांना सांगून माझे लग्न झाले असल्याचे सांगितले.

त्यानंतर जैन याने महिलेचा पती अमोल यास एक लाख साठ हजार रुपये दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर जैन या महिलेच्या वडीलांशी मनमाड येथे संपर्क साधला. मात्र व्यवसायिक अडचणीमुळे ते तिला याठिकाणी आणून सोडू शकत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जैन यांना कोतवाली पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी महिलेचा भाऊ नाशिक पोलिसांसह आल्याचे समजले.

दरम्यान, महिलेने नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात अमोल भालेराव, ललिता भालेराव, मुयरी भालेराव, नितीन सारवान, मेघा सोलंकी, गोपाळ सोळंकी यांचे विरोधात फिर्यादीची व विक्री केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*