शिवाजीनगर परिसरात पतीनेच केला पत्नीचा खून

0
नाशिक | सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील धृवनगर परिसरात किरकोळ वादातून पतीने पत्नीचा जाळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पती जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धृवनगर येथील समशेर अबला शाह, (वय 38, रा. प्लॉट क्रमांक 36 एकदंत हार्इटस, नवीन बांधकाम सार्इट, मराठी शाळेजवळ) हा पत्नी आयशा खातून समशेर शाह समवेत राहत होता.

मंगळवारी (दि.१२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण विकोपाला गेले. यातून राग येऊन समशेरने पत्नी आयशाला ज्वलनशील पदार्थ टाकून माचिसने पेटवून दिले. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच झोन एकचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ राजू भुजबळ, गंगापूर पोलीस निरीक्षक मोरे व सरकारवाडा पोलीस निरीक्षक भगत यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. याप्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

*