Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विवाहितेच्या खूनप्रकरणी पती व सासर्‍यास जन्मठेप

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – इंडिका कार घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावेत या कारणावरून विषारी पदार्थ पाजून खून केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील वैशाली गोविंद हारदेचा पती गोविंद सर्जेराव हारदे व सासरे सर्जेराव विठोबा हारदे यास दोषी ठरवून अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपये दंड. तसेच दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तर महिला आरोपी कमल सर्जेराव हारदे हीस संशयाचा फायदा देत निर्दोषमुक्त केले आहे.

या खटल्याची माहिती अशी, राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे राहणार्‍या वैशाली गोविंद हारदे (वय-30) यांना जुनी इंडिका कार घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणावेत, या कारणावरून वैशालीचा पती गोविंद सर्जेराव हारदे, सासरा सर्जेराव विठोबा हारदे व सासू कमल सर्जेराव हारदे (सर्व रा. तुळापूर ता. राहुरी) यांनी संगमत करून वैशाली हिला शिवीगाळ, मारहाण करून तिचा वर्षभर शारीरिक व मानसिक छळ केला.

6 जुलै 2013 रोजी माहेरच्या लोकांनी पैसे दिले नाहीत म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली. तसेच विषारी कीटकनाशक पाजून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत विहिरीत टाकून दिले. यावरून आरोपीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भादवी कलम 302,498(अ),323,504,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय, नगर येथे सुनावणी पूर्ण झाली आहे.

न्यायालयाने आरोपी गोविंद सर्जेराव हारदे व सर्जेराव विठोबा हारदे यांना कलम 302,201 खाली दोषी धरत त्यांना भादवी 302 नुसार जन्मठेप व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी तसेच भादवी 201 नुसार दोन वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.

मृताची सासू कमल सर्जेराव हारदे हिला संशयाचा फायदा घेऊन निर्दोषमुक्त केले आहे. या गुन्हाचा तपास तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी केला असून सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी वकील केसकर यांनी काम पाहिले व पैरवी अधिकारी म्हणून हवालदार बी. बी. बांदल यांनी मदत केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!