प्रकृती गंभीर झाल्याने एक उपोषणार्थी जिल्हा रुग्णालयात

0

सातवा दिवस : अन्य उपोषणार्थींवर जागेवरच उपचार

कुकाणा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे श्रीरामपूर-परळी रेल्वेमार्गासाठी सुरू असलेले उपोषण सहाव्या दिवशीही सुरुच होते.

काल प्रकृती बिघडलेल्या कारभारी गरड यांना सायंकाळी 5 वाजता जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे .तर उर्वरीत पाच उपोषणार्थींनी जिल्हा रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर जागेवर उपचार करण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकार्‍यांचा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आले. मात्र रेल्वे विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांच्या ठोस आश्‍वासनाचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार रितेश भंडारी, कारभारी गरड, महेश पुंड, निसार सय्यद, प्रकाश देशमुख, सुरेश नरवने यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर बुधवारपासून हे उपोषण आणखी तीव्र करण्यासाठी कुकाणा व परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी साखळी उपोषणही चालू केले आहे.

पहिल्या दिवशी अजित मंडलिक हिंदवी प्रतिष्ठानचे विशाल निकम , सलीम शहा, राजेंद्र खराडे, किरण शिंदे, शिवाजी कर्डिले, राजेंद्र म्हस्के, भानुदास मीसाळ, रमेश सोनवने, सोमनाथ कचरे, काका नरवने, समीर शहा, शुभम कदम, शिवाजी म्हस्के, लतिफ शेख, डॉ. महेशराजे देशमुख आदींनी साखळी उपोषणाला बसून पाठिंबा दिला. दिवसभरात बाळासाहेब देठे, लखन गरड, ज्ञानेश्‍वर फसले, माजी सभापती भाऊसाहेब पटारे, माजी उपसभापती अशोकराव मंडलिक, तुकाराम काळे, जनार्दन जाधव, रामकृष्ण कांगुणे, जीवनराव वंजारे, शंकरराव भारस्कर आदींनी उपोषणस्थळी भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

*