रेल्वे मार्ग प्रकरणी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

0

खासदार लोखंडेंसह नगरच्या रेल्वे अधिकार्‍यांनी केली चर्चा

कुकाणा (वार्ताहर) – श्रीरामपूर-परळी या रेल्वेमार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथे सुरू असलेल्या उपोषणास दुसर्‍या दिवशी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कुकाणा येथे येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे सांगून उपोषण सोडण्याची विनंती केली.
मात्र उपोषणकर्ते रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड यांनी मुंबई रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्याशी उपोषणस्थळी चर्चा झाल्यावरच उपोषण सोडणार असल्याचा ठाम निर्धार सांगितला.
उपोषणाला परिसरातील सामाजिक संघटना व जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, कॉ. बाबा अरगडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, दौंडचे आरपीएफएस आय. बी. वैरागकर, ज्ञानेश्‍वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक देसाई देशमुख, क्रांतिकारीचे ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष नबाब शहा,
उपाध्यक्ष गणेश घाडगे, भाऊसाहेब कचरे, पोपट पुंड, शाहुराव उगले, बन्सीभाऊ एडके आदींनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, नायब तहसीलदार प्रदीप पाठक, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, वैद्यकीय अधिकारी रामेश्‍वर शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.

उपचारास नकार –
सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून उपोषणकर्त्यांना रक्तातील साखर व युरीन कीटोन बॉडी च्या तपासण्यासाठी रक्त व युरीन चे नमुने पाठवले आहेत. रितेश भंडारी, प्रकाश देशमुख, महेश पुंड, कारभारी गरड यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची आवश्यकता आहे. परंतु सर्व उपोषणकर्त्यांनी उपचारास नकार दिला.

LEAVE A REPLY

*