कुकाण्यात सातव्या दिवशी एका उपोषणार्थीचे आमरण उपोषण सुरुच

0

बुधवारी रात्री उशिरा चौघांना उपचारासाठी नगरला हलविले; पाठिंब्यासाठी ग्रामस्थांचे साखळी उपोषण

कुकाणा (वार्ताहर) – श्रीरामपूर -परळी रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी कुकाणा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रकृती खालावल्याने एका उपोषणार्थीला जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आणखी पाच जणांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.
बुधवारी सायंकाळी कारभारी गरड या उपोषणार्थीला प्रकृती खालावल्याने जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा निसार सय्यद महेश पुंड, सुरेश नरवणे, प्रकाश देशमुख या चौघांनाही प्रकृती खालावल्याने जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे काल गुरुवारी सातव्या दिवशी रितेश भंडारी हे एकमेव उपोषणकर्ते उपोषणस्थळी उरले. त्यांना पाठिंब्यासाठी ग्रामस्थ व कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासमवेत चक्री उपोषणास बसलेले आहेत.
उपोषणासाठी जवळपास 40 संघटना व ग्रामपंचायतीने ठराव करून पाठिंबा दिलेला आहे. बुधवारपासून परिसरातील तरुणांनी साखळी उपोषण देखील सुरू केले आहे यावेळी संभाजीराव दहातोंडे यांनी देखील संघटनेला पाठिंबा दर्शविला.
सातव्या दिवशीच्या साखळी उपोषणात बाजीराव मुंगसे, लतीफ इनामदार, भानुदास मिसाळ, मुसा इनामदार,
पोपटराव सरोदे, मधुकर पावसे, सतीश मुथा, भाऊसाहेब खाटिक, सुरेश खाटिक, दादा थोरे, दिलीप खाटिक, सनी जगदाळे, हरिश्‍चंद्र खाटिक, भाऊसाहेब कचरे, भैय्यासाहेब देशमुख, रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष नबाब शहा, उपाध्यक्ष गणेश घाडगे, श्री. एरंडे, डॉ. महेश देशमुख, गणेश मोढवे, पांडुरंग कावरे, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

मोठी तीर्थक्षेत्रे जोडणारा मार्ग, रेल्वेमंत्र्यांना भेटणार ः गडाख
या रेल्वे मार्गाबाबत उपोषणकर्त्यांसह आपण स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊ असे खासदार गडाख यांनी सांगितले. यामुळे मोठ-मोठी तीर्थक्षेत्रे जोडली जाणार असून 9-10 साखर कारखाने या मार्गावर येत असल्याने साखर वाहतुकीला मदत होईल. हा मार्ग झाल्यास नेवासा-शेवगाव तालुक्याचा विकास होऊन विकासाला चालना मिळेल.

LEAVE A REPLY

*