Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : मखमलाबाद शिवारात हाडांचे सापळे आढळून आल्याने खळबळ

Share

पंचवटी | वार्ताहर

मखमलाबाद शिवारात ड्रेनेज लाईन साफ करताना हाडांचे सापळे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फोरेन्सिक तज्ञांना पाचारण केले आहे. अद्याप पोलीस सूत्रांनी कुठलीही माहिती दिलेली नाही, मात्र सापळे मानवी असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिक माहिती अशी की, काल (दि. १८) दुपारी महापालिकेत ड्रेनेज ब्लॉक झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर काही कर्मचारी याठिकाणी ड्रेनेज साफ करण्यासाठी गेले होते.

ड्रेनेज साफ करत असताना मानवी कवटीसारखा भाग, तसेच हाडांचे भाग आढळून आले. घाबरलेल्या अवस्थेत  कर्मचारी अर्धवट काम सोडून महापालिकेत परतले. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती म्हसरूळ पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे फिरवली. तसेच फोरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आले असून विभागातील अधिकाऱ्यांनी कवटी, हाडांचे सापळे ताब्यात घेतले आहेत.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!