Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये ह्यूमन मिल्क बँक स्थापणार; ‘महान्यूओकॉन नाशिकॉन’ परिषदेत घोषणा

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये ह्यूमन मिल्क बँक स्थापण्यासाठी प्रयत्नशील त्यासाठी सर्वोतोपरीने पावले उचलून हा प्रकल्प पूर्णत्वाला नेऊ, अशी माहिती इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय आहेर यांनी दिली. बालरोगतज्ञांची राष्ट्रीय संघटना इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित ‘महान्यूओकॉन नाशिकॉन -2019’ राज्यस्तरीय परिषदेत दुसर्‍या दिवशी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये ‘सुरक्षित भावी पिढी’ संकल्पनेवर आयोजित बालरोग तज्ञांच्या परिषदेचा दुसरा दिवस कार्यशाळा आणि व्याख्यांनामुळे माहितीपूर्ण ठरला. देशातील पहिली ह्यूमन मिल्क बँक स्थापनेत मोलाची भूमिका बजावणार्‍या मुंबईस्थित सायन हॉस्पिटलच्या निवृत्त अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी ह्यूमन मिल्क बँके ची स्थापना आणि निकड यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, नवजात शिशुची वाढ व त्यांच्यामधील प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आईचे दूध अमृत असून काही कारणामुळे अनेक माता स्तनपान करू शकत नाही. अशा माताच्या बाळासाठी ह्यूमन मिल्क बँक वरदान ठरत आहे.

जगात ब्राझिल या देशात 200 हून अधिक ह्यूमन मिल्क बँक असून आपल्या राज्यात 16 मिल्क बँक आहेत. जागृतीमुळे अनेक माता स्वेच्छेने यात दूध देण्यासाठी पुढे येत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. अशा मिल्क बँक स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये शासनाने काही दिशा निर्देश दिले असून अत्यवस्थ नवजात शिशुचे प्रमाण बघता सर्वच शहरात याची आवश्यकता असल्याचेही डॉ. मोंडकर म्हणाल्या.

नॅशनल निओनॅनोटोलॉजी फोरमचे राज्य अध्यक्ष डॉ. संदीप कदम यांनी परिषदेच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले नवजात अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी या माध्यमातून अनेक सकारात्मक माहिती मिळते. संस्थतर्फे आगामी परिषदा या लहान शहरात घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. पुरुषोत्तम देवी व डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. संगीता लोढा, डॉ. सागर सोनावणे, डॉ. प्रवीण काळे, डॉ. संदीप पाटील, डॉ. शाम चौधरी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सुशील पारेख, डॉ. कविश मेहता व डॉ. अमित पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

ह्यूमन मिल्क बँकेची मुहूर्तमेढ सन 1989 मध्ये मुंबईत झाली. सायन हॉस्पिटलमधील नवजात शिशूसाठी तेथीलच माता हे दूध देत असत. त्यासाठी माता निरोगी असणे आवश्यक असते. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येतात. त्यानंतर अशा मातांचे दूध पाश्चराईज्ड करून उणे 25 अंश तापमानावर साठवले जाते.

आंतरराष्ट्रीय मानकानुसार योग्यरितीने साठवणूक केलेले दूध 6 महिन्यांपर्यंत वापरता येऊ शकते. नाशिकमध्ये अशा प्रकारची बँक सुरू झाल्यास त्याचा मोठा फायदा होणार असून जन्मजात शिशू दगवण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी होईल, असा आशावाद तज्ञांनी व्यक्त केला.

ह्यूमन मिल्क बँकेची मुहूर्तमेढ सन 1989 मध्ये मुंबईत झाली. सायन हॉस्पिटलमधील नवजात शिशूसाठी तेथीलच माता हे दूध देत असत. त्यासाठी माता निरोगी असणे आवश्यक असते. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येतात. त्यानंतर अशा मातांचे दूध पाश्चराईज्ड करून उणे 25 अंश तापमानावर साठवले जाते. आंतरराष्ट्रीय मानकानुसार योग्यरितीने साठवणूक केलेले दूध 6 महिन्यांपर्यंत वापरता येऊ शकते. नाशिकमध्ये अशा प्रकारची बँक सुरू झाल्यास त्याचा मोठा फायदा होणार असून जन्मजात शिशू दगवण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी होईल, असा आशावाद तज्ञांनी व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!