Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

Video: ‘स्मार्ट’ रस्त्यामुळे प्रचंड हाल; उर्वरित कामे लवकर आटोपण्याचे मागणी

Share

नाशिक | सना शेख

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मध्ये नाशिक शहराचा सामावेश केला, ही बातमी ऐकून पूर्ण नाशिक वासीयांना आनंदच झाला असेन, यात काही शंका नाही. परंतु प्रत्येक्षात जेव्हा सी.बी.एस व मेहेर सिग्नल वरील रस्त्याचे काम चालू झाले, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नाशिक सिटी ही खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल असे वाटले होते.

मात्र सध्याची स्थिती ही अत्यंत त्रासदायक आहे. ‘स्मार्ट सिटीचे’ विकास काम करणाऱ्या ज्या काही ‘एजन्सी’ आहेत त्यांना प्रशासनाने कुठल्या अटी शर्तीवर हे काम दिलेले आहे. ह्याचे संशोधन करने आता गरजेचे झाले आहे. कलेक्टर ऑफिस व सी.बी.एस हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि येथे प्रचंड रहदारी असते, ह्याचा प्रशासनाने विचार करावयास हवा होता आणि सदर ठिकाणी विकास करत असतांना कामाचे साचेबद्ध नियोजन असने अत्यंत आवश्यक आहे.

दिवसरात्र रोज लहान मोठे अपघात होतत जे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांच्या महाविद्यालयात पोहोचायला विनाकारण उशीर होतो, रिक्षा चालक, सामान्य नागरिक, आस पासची दुकाने ट्रॅफिक पोलिस प्रत्येक व्यक्तीला दररोजच्या जीवनात अडथळे निर्माण होत आहे. दीड वर्षा पासून सुरू असलेल्या कामाचा जिल्हाधिकारयानी समक्ष येऊन पाठपुरावा घ्यावा व लवकरात लवकर काम पूर्ण करावे असे नागरिकांना वाटू लागले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!