Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इव्हीएम जनजागृती रथाला भरघोस प्रतिसाद; नवमतदार शिकून घेतायेत मतदान प्रक्रिया

Share

नाशिक | संदीपकुमार ब्रह्मेचा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून एव्हीएम मशीनबाबत जनजागृती केली जात आहे. यासाठी एका वाहनात एव्हीएम मशीन ठेवून मतदानप्रक्रियेचा डेमो देण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात फिरणाऱ्या या वाहनाला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला असून नवमतदारांचा अधिक सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी मतदान प्रक्रिया याद्वारे समजून घेतली आहे.

वयाची १८ वर्षे पुर्ण होऊन पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांना आगामी निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. केव्हा मतदानाचा दिवस येईल आणि मतदान प्रक्रियेत आपला सहभाग लाभेल असेच काही या तरुणाईला झाले आहे.

नेमकं EVM आणि VVPAT मशीन आहे तरी काय?  याद्वारे कशाप्रकारे मतपेटीत मतदान पार पडते. मतदान कसं करता येत याचा अनुभव प्रात्यक्षिकद्वारे निवडणूक आयोगाने फिरत्या जनजागृती अभियानातून उपलब्ध करून दिला आहे.

सर्वच राजकीय पक्षासाठी मतदानाचा केंद्रबिंदु यंदा तरुणाई असल्याने येणारे सरकार कस असावं आणि तरुणाईसाठी येणाऱ्या सरकारकडून काय मिळणार याबाबत खल निघत आहे. एव्हीएमबाबत जनजागृती केली जात असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकदा मतदान प्रक्रिया नवखी असल्यामुळे अनेक मतदारांची मते बाद व्हायची. आता जनजागृती केल्यामुळे हे होणार नाही असाही दावा केला जात आहे.


निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ५ सप्टेंबर पासुन फिरत्या जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. नियमित वर्दळीच्या ठिकाणी वाहन उभे करून अनेक मतदार इव्हीएमबाबत असलेल्या शंकांचे निरसन करून घेतात. यामध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे.

सुनिल सोनटक्के, मास्टर ट्रेनर
EVM व VVPAT जनजागृती अभियान

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!