Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

VIDEO : पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग; १५ ते १६ दुकानं जळून खाक

Share

पिंपळगाव बसवंत l पिंटू पवार

पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाटा येथील जवळपास पंधरा ते सोळा दुकानं जळुन खाक झाले. रात्री दोन वाजता लागलेली आग सात वाजेपर्यंत सुरू होती.

आगीची माहिती मिळताच ओझर व पिंपळगाव येथील अग्निशमन दलाने जवळपास पंचवीस फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली.

पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग; १५ ते १६ दुकानं जळून खाक

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, ६ मार्च, २०२०

आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीत पंधरा ते सोळा दुकानं जळून खाक झाली असून त्यात कापड, भांडी, भंगार, चप्पल-बूटांसह काही मिठाईच्या दुकानांचादेखील समावेश आहे.

मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीनं क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्यानं स्थानिकांची धावपळ उडाली. यानंतर या परिसरात आरसीएफ जवानांचं पथक तैनात करण्यात आलं. पिंपळगाव येथील मध्य वस्तीतल्या मुख्य रस्त्यावर आग लागल्यानं शेकडो लोकांनी गर्दी केली.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच ठिकाणी १९८८ मध्येही आग लागली होती. त्यात २५ दुकानं खाक झाली होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!