Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमोरवाडी गावात फर्निचरच्या दुकानास आग; तीन दुकानं जळून खाक

मोरवाडी गावात फर्निचरच्या दुकानास आग; तीन दुकानं जळून खाक

नवीन नाशिक l प्रतिनिधी

नवीन नाशिकमधील अमरधाम मोरवाडी गावानजीक फर्निचरच्या दुकानांना लागलेल्या आगीत तीन दुकानांचे नुकसान झाले.

- Advertisement -

आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. आगीचे लोळ बाहेर दिसताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली.

यानंतर घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांच्या मदतीने जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.

- Advertisment -

ताज्या बातम्या