आयफोन एक्स पेक्षाही महाग आहे हा नवा ॲन्ड्रॉईड फोन

0

देशदूत डिजिटल विशेष

नुकताच बाजारात आलेला आयफोन एक्स हा सर्वात महागडा फोन असल्याचा तुमचा समज झाला असेल, तर तो विचार डोक्यातून काढून टाका.

कारण चीनच्या हुवावे कंपनीने नुकताच बाजारात आणलेल्या एका स्मार्टफोनने चीनमध्ये धूमाकूळ घातला असून त्याची किंमत आयफोन एक्सपेक्षाही महाग असल्याचे सांगितले जात आहे.

हुआवे मेट १०- पोर्शे डिझाईन असे या स्मार्टफोनचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी चीनच्या बाजारपेठेत हे कंपनीचे हे अल्ट्रा हाय एंड मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध झाले. लवकरच हा फोन भारतातील मेट्रो शहरात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

चीनमध्ये या फोनचे विक्री मूल्य सुमारे ९ हजार युआन ( १ लाख ६ हजार रुपये) इतकी होती. मात्र लोकांच्या वाढत्या मागणीमुळे हा फोन तब्बल तेथील प्रसिद्ध ऑनलाईन वेबसाईट ताओबाओवर २० हजार युआन म्हणजेच तब्बल १ लाख ९० हजार रुपये इतक्या वाढीव किंमतीला विकला गेला. आयफोन एक्स पेक्षाही ही किंमत जास्त समजली जात आहे.

सध्या कंपनीने मर्यादित स्वरूपात या फोनची विक्री सुरू केली आहे.  ॲमेझॉनवर या फोनची किंमत १ लाख ६ हजार रुपये इतकी आहे.

हुआवे मेट १०- पोर्शे डिझाईनचे वैशिष्ट्य

 • ऑपरेटींग सिस्टिम : ओरिओ ८.०
 • प्रोसेसर : HUAWEI Kirin 960, Octa-core CPU (4 x 2.4 GHz A73+ 4 x 1.8 GHz A53) + i6 co-processor, Mali-G71 MP8
 • रॅम ६ जीबी
 • इंटर्नल स्टोअरेज : २५६ जीबी (वाढवू शकत नाही)
 • जीएसएम वरच चालतो. सीडीएमएला सपोर्ट करत नाही.
 • कॅमेरा : दोन बॅक कॅमेरे : २० मेगा पिक्सेल + १२ मेगा पिक्सेल ड्युअल एलईड फ्लॅशसह, तर सेल्फी कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा
 • ड्युअल सीम
 • एनएफसी, फोर जी, वायफाय, ब्लू टूथ ४.२
 • बॅटरी क्षमता : ४०००एम एम एच
 • फिंगरप्रिंट सेन्सर
 • डिस्प्ले : 2160 x 1080 पिक्सेल्स (ओएलईडी स्क्रीनसह)

LEAVE A REPLY

*