नाशिक जिल्हा बारावी परीक्षा निकालात नीचांकी

सर्वाधिक कॉपी प्रकरणात नाशिक अव्वल

0
नाशिक | दि. ३० प्रतिनिधी- नाशिक विभागात बारावी परीक्षेच्या निकालात नाशिक जिल्ह्याची निकालाची आकडेवारी नीचांकी आहे. विभागात नंदुरबार जिल्हा ९१.०५ टक्के मिळवून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकावर आहे. तर धुळे जिल्ह्याने ९०.८९ टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. जळगाव ८७.६२ टक्के मिळवून तृतीय स्थानी तर नाशिक जिल्हा ८७.०९ टक्के मिळवून चतुर्थ स्थानी तळाला फेकला गेला.
नाशिक विभागात बारावी कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसाय अभ्यासक्रम शाखेचे सुमारे १ लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७० हजार ०९९ विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील आहेत. यापैकी ६१ हजार ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा निकाल इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी लागला आहे.

नाशिक विभागातील कला शाखेत ६७ हजार २५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५३ हजार ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.५९ टक्के एवढे आहे. विज्ञान शाखेत प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेत ९१.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात ६६६० पैकी ५४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नाशिक विभागात तीन वर्षांपूर्वी नवीन अभ्यासक्रम असतानासुद्धा कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय शिक्षण शाखेचा निकाल ८८.७१ टक्के लागला होता. त्यावेळी सुमारे ११७९४९ विद्यार्थी तिन्ही शाखेतून उत्तीर्ण झाले होते. तर २०१५ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत विभागाची टक्केवारी किंचीत घसरून निकाल ८८.१३ टक्क्यांवर घसरला होता.

गतवर्षी बारावीच्या परीक्षेत चारही जिल्ह्यातून १ लाख २४ हजार ७०७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ८३.९९ टक्के लागला होता. त्यामुळे निकालाची टक्केवारी सुमारे ४ टक्क्यांनी घसरली होती.

२३५ रिपिटर प्रथम श्रेणीत
नाशिक विभागात फेब्रुवारीमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेला सुमारे ४५३७ पुनर्परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी सुमारे १९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष नैपुण्यासह प्रथम श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २८ आहे. पण प्रथम श्रेणी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या २३५ एवढी आहे. तसेच द्वितीय श्रेणीत ५०४ विद्यार्थी पास झाले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय शिक्षण शाखेतील पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रमाण शेकडा ४१.९४ टक्के आहे.

पेठच्या मुलांची आघाडी
जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होणार्‍यांमध्ये मुलींचे शेकडा प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर गुणांमध्ये विशेष प्राविण्य, प्रथम श्रेणीत तिन्ही शाखेतील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र मुलींची जिल्ह्यात उत्तीर्णतेची आघाडी पेठमध्ये थोपवण्यात मुलांची कामगिरी सरस ठरली.

दुर्गम तालुका असलेल्या पेठमध्ये शेकडा ९२.७२ टक्के मुलांनी बारावीत तिन्ही शाखेत यश संपादन केले. तर या तालुक्यात शेकडा ८९.९१ टक्के मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. त्र्यंबक तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात उत्तीर्ण होण्याची कामगिरी मुलींनी केली आहे. येथील मुलींनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांपेक्षा शेकडा ९५.५४ टक्के निकाल लावला आहे.

LEAVE A REPLY

*