Type to search

मुख्य बातम्या हिट-चाट

हृतिकचा ‘सुपर ३०’ या दिवशी प्रदर्शित होणार

Share
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाचं प्रदर्शन गेल्या वर्षभरापासून रखडलं आहे. हा चित्रपट कंगनाच्या ‘मणिकर्णिका’सोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता.
मात्र गेल्या महिन्याभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हृतिकच्या चाहत्यांच्या नशीबी प्रतीक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. अखेर ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’नं ‘सुपर ३०’ च्या प्रदर्शनाबद्दल खुलासा केला आहे. हृतिकचा हा चित्रपट आता २६ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘सुपर ३०’ हा चित्रपट बिहारमधील शिक्षक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. गणित तज्ज्ञ असलेले आनंद कुमार हे गरीब मुलांना आयआयटीच्या परीक्षेसाठी तयार करीत आहेत, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ही भूमिका साकारण्यासाठी हृतिकने खूप मेहनत घेतल्याचे सांगण्यात येतेय. या चित्रपटात हृतिकची पत्नी म्हणून कुमकुम भाग्य या मालिकेतील अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे.

दिग्दर्शक होते Me Too च्या जाळ्यात

या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.  विकासवरील आरोपानंतर हृतिकनं त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यामुळे काही काळ चित्रपटाचं शुटींग लांबलं होतं. तसेच या चित्रपटात अनेक नवीन दृश्यांचा ऐनवेळी समावेश करण्यात आला त्यामुळेही चित्रीकरणास विलंब झाला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!