Type to search

Featured हिट-चाट

हृतिकचा ‘क्रीश-4’ येणार, जानेवारीत चित्रीकरणाला सुरुवात?

Share

मुंबई : सुपर-30 आणि वॉरने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा सुपरहिरो क्रीशच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हृतिक क्रीश-4 च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचं कळतं. क्रीश-4 सोबतच बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्येही हृतिक काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येणारं वर्ष हृतिकसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जानेवारीत हृतिक रोशन, दिग्दर्शक आणि वडील राकेश रोशन आगामी क्रीश-4 सिनेमाची घोषणा करणार आहेत. खरंतर याच महिन्यात राकेश रोशल क्रीश-4 ची घोषणा करणार होते. पण चित्रपटाच्या कथेवर अद्याप काम पूर्ण झालेलं नसल्याचं कळतं दरम्यान, क्रीश-4 चित्रपटाचं दिग्दर्शन संजय गुप्ता करणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!