Type to search

हिट-चाट

पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार हृतिक-दीपिका

Share

मुंबई : फराह खान व रोहित शेट्टी हे दोघे मिळून अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक करणार आहे. आता या चित्रपटात अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या भूमिकेत कोणते कलाकार दिसणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तानुसार सत्ते पे सत्ता चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर हृतिकसह कोणती अभिनेत्री दिसणार या चर्चा रंगल्या होत्या. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. हृतिकसह अभिनेत्री दीपिका पादूकोण दिसणार असल्याचे पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

दीपिका आणि हृतिकने यापूर्वी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता दीपिका आणि हृतिक सत्ते पे सत्ता चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. फराह आणि रोहितच्या मते दीपिका आणि हृतिक या भूमिकेसाठी एकदम योग्य कलाकार आहेत. दरम्यान दीपिकाला चित्रपटाची कथा आवडली असल्याचे देखील म्हटले आहे. राज एन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला सत्ते पे सत्ता हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत होते. सात भावंडांभोवती ही विनोदी कथा फिरते. पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार ही कथा आधुनिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न फराह खान करणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!