Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

धार्मिक नगरीतच मंदिर व्यवस्थापन आणि पुजाऱ्यांवर भाविक नाराज

Share

नाशिक | प्रतिनिधी

मंदिरांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये मंदिरांचे व्यवस्थापन आणि पुजाऱ्यांच्या वर्तणुकीविषयी भाविकांमध्ये नाराजी असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. पुजाऱ्यांची वाढती अरेरावी, भाविकांसोबत केले जाणारे गैरवर्तन, गलथान व्यवस्थापन याबद्दल भाविकांच्या भावना तीव्र आहेत. या बाबी एच. पी. टी. कला आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आल्या आहेत.

सण आणि उत्सव काळात ४१ टक्के भाविक रोज मंदिरात जातात. मात्र, पुजाऱ्यांनी मंदिरांचे व्यापारीकरण केल्याचा सूर या सर्वेक्षणातून ऐकावयास मिळाला. गोदा तीरावरील होणाऱ्या पूजविधींमध्ये ही भाविकांच्या पैशांची लूट होते असे, भाविकांना वाटते तर ७६ टक्के भाविकांना मंदिरात वाहिलेले नारळ, फुले, प्रसाद असे पूजा साहित्य सत्कारणी लागत नसल्याचे, सर्वेक्षणात आढळून आले आहे.

अनेक नवसांनिमित्त देवीच्या मूर्तीवर भाविकांकडून वस्त्र, साड्या वाहिल्या जातात. या दान हे पुनर्विक्रीस ठेवले जाते असे ७७ टक्के लोकांना वाटते, तर ६२ टक्के भाविकांना मंदिरांना रोख देणगीचा गैरवापर होतो, असे वाटते.

वयोवृद्धांसोबतच मंदिरात जाणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र मंदिरे ही श्रध्दास्थळेच राहावीत त्याठिकाणी सेल्फी पॉईंट असू नयेत असे ९७ टक्के तरुणांनी नमूद केले आहे.

मात्र, वास्तवात मंदिरांमध्ये सेल्फी घेण्याचा मोह तरुणांना आवरता येत नाही असे ही या संवादातून जाणवले. देवाच्या दरी सर्वसमान असतात असे म्हणतात मात्र मंदिरातील व्ही. आय. पी. दर्शन व पेड दर्शन यामुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होतो असे ८७ टक्के भाविकांना वाटते.

यातून आर्थिक दुफळी तयार होऊन गरीब – श्रीमंत हा भेदभाव होतो असे मत ५३ टक्के भाविकांनी सांगितले. नाशिक हे शहर हे मुळात प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तरीदेखील तेथील मंदिरांचा व त्यांच्या नावाबद्दलचा  इतिहासाचा अभ्यास केवळ ५२ टक्के लोकांनी केलेला आढळला.

याच बरोबर मंदिरच्या पवित्र्यासोबत त्याची स्वच्छता राखली जाते असे ६० टक्के लोकांना वाटते. तसेच ७९ टक्के लोकांना मंदिरांच्या सूचनांचे पालन केले जाते, असे वाटते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!