अशी मिळवा पडणाऱ्या विजांपासून सुरक्षितता

0

मान्सूनच्या आधी आणि मान्सून संपतांना विजा चमकतात. आपण नेहमीच पाहतो ढगातून जमिनीवर विजा पडतात, जीवित, वित्तहानी होते तसेचविद्युत उपकरणे जळतात. आकाशातून कोसळणारा प्रचंड विदयुत प्रवाह म्हणजे वीज पडणे किंवा चमकणे होय.

 आकाशातून कोसळणा-या विजेचा प्रवाह प्रचंड म्हणजे सरासरी सुमारे 25 हजार ऍम्पीअर पर्यंतही पासून 40 लाख ऍम्पीअर पर्यंतचाही असू शकतो. वीज हा निसर्गचक्राचा भाग आहे. कमीत कमी रोध असेल अशा वस्तू, ठिकाण किंवा व्यक्तीवर कोसळणे हा भौतिकशास्त्राचा नियम पाळण्याचे काम वीज करते. जीवघेणी वीज कधी, कुठे, कशी कोणावर कोसळते हे जाणून घेणे, त्यापासून स्वसंरक्षण करणे आणि कोणावर वीज कोसळलीच तर त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचविणे एवढेच या निसर्गचक्रात आपल्या हाती आहे.

प्रवासात विजांपासून सुरक्षितता

 • प्रकाश/ ध्वनी अनुपात नियम : साधारणत: विजा या सहा ते सात किलोमीटर परिसरात पडतात. अनेकदा त्या 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापून अगदी निरभ्न आकाशाच्या प्रदेशातही पडतात. विजांचे दिसणे आणि त्यांचा आवाज ऐकू येणे यातील वेळेतील तफावतीवरुन विजा किती दूर आहेत याचा ढोबळ अंदाज लावता येतो. वीज चमकणे म्हणजे प्रकाश उत्पन्न होणे व ध्वनी उत्पन्न होणे या क्निया एकाच वेळी घडतात. प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग वेगवेगळा आहे. ध्वनीचा हवेतला साधारणत: वेग हा 300 मीटर प्रतीसेकंद इतका असतो. प्रकाश दिसल्यानंतर विजा कडाडण्याचा आवाज ऐकू येण्यास जितका जास्त वेळ लागतो तेवढया विजा जास्त दूर असतात. वीज चमकणे व त्याचा गडगडाट ऐकू येणे यात 5 ते 10 सेकंद अंतराल कालावधी असणे म्हणजे विजांपासून आपण अनुक्रमे दिड ते साडेतीन किलोमीटर या अत्यंत धोकादायक क्षेत्रात असतो. आवाज न करता पडणारी वीज पण शक्तीशाली आणि विध्वंसक ठरु शकते. आवाज निर्माण न करणा-या उन्हाळी विजा यांना हा नियम लागू नाही मात्र या विजाही जीवघेण्याच आहेत.
 • * 30 मिनिटांचा सुरक्षा नियम :- प्रवासाला पुन्हा बाहेर निघतांना 30 मिनिटांचा सुरक्षा नियम ही सर्वांनी पाळायला हवा. जो विजांपासून जास्त सुरक्षितता प्रदान करतो.30 मिनिटांचा नियम असे सांगतो की, प्रवासाला निघतांना शेवटची चमकणारी वीज 29 व्या मिनिटाला जरी दिसली किंवा विजेचा गडगडाट कानी पडला तरी पुन्हा पहिल्यापासून 30 मिनिटांच्या कालावधीची मोजणी सुरु करावी. शेवटचा आवाज किंवा विजेचे कडाडणे संपल्यानंतर अर्धा तासाने म्हणजे 30 मिनिटांनीच प्रवासाला बाहेर पडायला हवे. विजा चमकत असतांना 30 मिनिटाच्या नियमाची तोडमोड करीत केलेली प्रवासाची घाई म्हणजे आपणच आपल्या ‘अंतिम प्रवासाची’ केलेली तयारी ठरु शकेल. चमकदार विजांच्या रेषा शक्तीशाली आहेतच; मात्र आपली जीवनरेखा अधिक भाग्यशाली बनविणे आपल्याच हातात आहे हे विसरुन चालणार नाही. सुरक्षिततेच्या घेतलेल्या काळजीने हे नक्कीच शक्य आहे.
 • फॅरेडचा पिंजरा आणि सुरक्षित प्रवास: फॅरेडच्या पिंज-याचा नियम म्हणजे प्रवासात जीवदान देणारी संजीवनीच होय. हवाबंद डब्यावर विदयुतभार दिला असता तो त्या डब्याच्या केवळ बाहेरच्या बाजूने आवरणावर पसरतो आणि आतमध्ये जावू शकत नाही असे फॅरडे यांनी शोधून काढले. हा हवाबंद डबा म्हणजेच फॅरडेचा पिंजरा होय, ज्यात प्रत्येक गोष्ट विजेच्या धक्कयापासून सुरक्षित राहते.प्रवास करतांना आपल्या वाहनाचा म्हणजे कार आदींच्या काचा हवाबंद करुन घेता येतात. मग आपल्या वाहनावर प्रत्यक्ष विजेचे अनेक लोळ जरी पडले तरी आपण अगदी सहीसलामत बचावतो. मात्र आतील ऑक्सिजन संपेपर्यत वेगाने प्रवास करीत सुरक्षित ठिकाणी पोहोचणे यासाठीच हा नियम उपयोगी ठरतो. अन्यथा गुदमरण्याचा धोका आहेच. हवाबंद याचा अर्थ अगदीच हवाबंद, कारण हवा जाण्यास अगदी सुई एवढी जागा शिल्लक राहिल्यास विदयुतभार वाहनात शिरकाव करण्याचा धोका आहे. म्हणून आजकाल ‘एअर टाइट’ वाहनांची मागणी वाढत आहे.

  विजांबाबत काही गैरसमज 

  * लायटनिंग अरेस्टर आणि सुरक्षित घर : आकाशातून कोसळणा-या विजेला झेलण्यासाठी ‘लायटनिंग अरेस्टरचा’ उपयोग करतात. मोठय़ाइमारतीच्या संरक्षणासाठी इमारतीवर Lightning Arrester लावतात. लायटनिंग अरेस्टर म्हणजे एक टोकदार तांब्याची सळई व व तिच्या वरच्या बाजूला त्रिशूणासारका आकार केलेला असतो. त्याला तांब्याची पट्टी जोडून ती खाली आणून जमिनीत गाडतात म्हणजेच अर्थिग करतात. वरून दोन वेगवेगळ्या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्यूमिनियमच्या पट्टय़ा आणून खाली जमिनीत त्याचे वेगळे वेगळे आर्थिग केल्यास उत्तम. कारण विजेपासून निर्माण होणारा वीज प्रवाह (Electric current) हा मेगाअ‍ॅंपियरमधे असतो. दोन वेगळ्या पण एकाच धातूच्या पट्टय़ा दोन ठिकाणी अर्थ केलेल्या असल्यामुळे प्रवाह दूभागून वाहतो. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होते व तो जमिनीत लगेच शोषला जातो. लायटनिंग अरेस्टरचा वरील भाग टोकदार असतो कारण टोकदार भागाकडे आकाशात निर्माण होणारी वीज ओढली जाते व लगेच जमिनीत शोषली जाते. गाडली जाते. लायटनिंग अरेस्टरचे आथिर्ंग कसे करावे व अर्थिगची उपयुक्तता काय आहे, हे आपण आता बघू या. आर्थिगला इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते.

 •  

  आर्थिग असे करतात :– जमिनीमध्ये साधारणत: ५ फुटापर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक फुटाच्या १’x१’ च्या १” (इंच) जाडीची तांब्याची,अ‍ॅल्युमिनीयमची किंवा  (Soft Iron) सॉफ्ट आयर्नची प्लेट पुरतात व प्लेटच्या सभोवताली कोळसा; मीठ; वाळू पुरतात. या क्रियेला ‘अर्थिग’असे म्हणतात. अर्थिग केलेल्या ठिकाणी व त्याच्या आसपास ओलावा राहील अशी खबरदारी घेतली जाते. वरून आलेल्या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्टय़ा या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या प्लेटला जोडतात. दोन एकाच धातूच्या पट्टय़ा एकाच धातूच्या प्लेटला वेगवेगळ्या ठिकाणी जोडतात. त्यामुळे विजेचा हेवी करंट दुभागून लगेच; चटकन अर्थ पट्टीमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. त्यामुळे इमारतीचे होणारे नुकसान टाळता येते. मनुष्यहानी टाळता येते. महत्त्वाच्या मोठय़ा इमारतींना लायटनिंग अरेस्टर लावलेले असतात. फ्लॅट स्कीम तसेच बंगल्यालासुद्धा हे लावून घ्यायला पाहिजेत. वेगवेगळ्या कंपन्या इंडियन स्टँडर्ड (क.र.) प्रमाणे लायटनिंग अरेस्टर लावून देण्याचे काम करतात. 

  अनेकदा विजा कोसळून आगीही लागतात यापांसून बचावासाठी लायटनिंग अरेस्टर लाभदायी सिध्द होते. 1752 साली बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी लायटनिंग अरेस्टरचा शोध लावला. लायटनिंग अरेस्टर लावणे आणि घरात थांबले की आपण विजांपासून सुरक्षित असतो असा अनेकांचा गैरसमज असतो. लायटनिंग अरेस्टर आसपासच्या उंच वस्तूंमध्ये सर्वाधिक उंचीवर आहे का हेच लायटनिंग अरेस्टरने मिळणारा फायदा दर्शविते. सुरक्षा कोन आणि सुयोग्य प्रकारे खोलवर आणि उपकरणांच्या आर्थिंग पासून वेगळे असलेले लायटनिंग अरेस्टर यावर आपली सुरक्षितता अवलंबून आहे. आपले घर पत्र्याचे असेल किंवा शेती- मळयात सर्वात उंच असेल तर ते असुरक्षितच आहे. कारण त्यावर विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. विद्युत खांबांवर, पाण्याच्या टाक्यावर लायटनिंग अरेस्टर लावू नये. इमारतीवरील उघड्या गजांवर, लोखंडी पाइपवर धन प्रकारच्या विजा इमारतीवर कोसलून संपुर्ण इमारत जमिनदोस्त करून टाकू शकते. इमारतींच्या गच्च्यावरील उघडे गज कापून सिमेंटने तो भाग विलेपित करावा.

  * मोबाईलला विजांचे आकर्षण : मोबाईल विजांना आकर्षित करतात हा देखील गैरसमजच आहे. विशेषत: प्रसारमाध्यमांमुळे हा गैरसमज वेगाने पसरला गेला. २००६ मध्ये मुंबई येथे समुद्नकिनारी आपल्या मित्रांचे मोबाईल सांभाळणा-या एका मुलीवर वीज कोसळली. मोकळ्य़ा जागी उभे असल्याने उंची वाढल्यामुळे वीज आकर्षणाने अशी दुर्घटना झाली. सर्वांचे मोबाईल या मुलीकडे होते हे विजा आकर्षित होण्याचे कारण मुळीच नाही. व्यावहारीक दृष्टीकोनातून बघितले तर मोबाईलच्या सिग्नल पॉवरपेक्षा, मोबाईल टॉवरवर मोबाईलरेंजसाठी कार्यरत असलेल्या असंख्य मोबाईल ऍन्टीनांची, सिग्नल पॉवर हजारोपट जास्त असते. अशा वेळी विजा या सेन्सर ऍन्टीनावर कोसळणे किंवा त्यांची दिशा बदलताना दिसणे तरी आवश्यक आहे; मात्र असे होत नाही. यावरुन देखील हे हे सत्य सिध्द होते की मोबाईल विजांना आकर्षित करीत नाही.

  * विजेचा शॉक मानवी शरीरातून : वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर आपल्याला शॉक बसेल हा देखील गैरसमज सर्वत्र रुढ आहे.परिणामी वेळेवर प्रथमोपचार आणि कृत्रिम श्र्वासोच्छवास न मिळाल्याने भारतात दरवर्षी हजारो लोकांचे मृत्यु होतात. सत्य हे आहे की मानवी शरीर वीज साठवूच शकत नाही तसेच एक सेकंदापेक्षा कमी काळात वीज कोसळण्याची संपूर्ण क्रिया घङून मानवी शरीरातून जमिनीत निघून जाते.

  * दूरच्या विजा : विजा दूर कोठेतरी चमकताना दिसत असतील तर आपण सुरक्षित आहोत हा देखील अजून एक गैरसमज आहे. कारण विजा पंधरा किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापून कोसळल्याची असंख्य उदाहरणे आहेत. यामुळेच विजा चमकत असतांना सुरक्षिततेसाठी क्निकेट, फुटबॉल आदी सामने देखील आंतरराष्ट्नीय पातळीवर ताबडतोब थांबविले जातात.

  * गडगडाट नसलेल्या विजा : आवाज न करणा-या उन्हाळी विजा घातक नसतात असा गैरसमज देखील रुढ आहे. विजांमध्ये सरासरी सुमारे25 हजार ऍम्पीअर पर्यंतही पासून 40 लाख ऍम्पीअर पर्यंतचा विदयुतप्रवाह (करंट) असू शकतो; त्यामुळे गडगडाटाचा आवाज आला नाही तरी अशी कोसळणारी वीज जीवघेणी ठरु शकते हे वैज्ञानिक सत्य आहे.

  * पायाळू माणूस : पायाकङून जन्म झालेल्या किंवा पायाळू माणसावर वीज कोसळण्याचा धोका जास्त असतो हा देखील एक गैरसमजच आहे विजा पडताना त्या कमीत कमी रोधक मार्गाची निवड करतात. एखादया व्यक्तीने डोक्याकङून जन्म घेतला की पायाकङून यावर व्यक्तीच्या शरीराची रोधकता अवलंबून नसते त्यामुळे विजांचा धोका जेवढा डोक्याकङून जन्म घेणा-या व्यक्तीला आहे तेवढाच पायाकङून जन्म घेणा-याला देखील आहे. पायाळू माणसाच्या पायात किंवा हातात धातूचे कडे घातल्याने विजा अशा व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतात.

  * धातूची वस्तू हातात बाळगणे : विजा चमकत असतांना स्वतः जवळ धातूचा तुकडा, धातूची दांडी असलेली छत्री, खुरपे, उलथनी, चमचे अशा वस्तू बाळगणे धोक्याचे आहे, अशामुळे उलट विज या वस्तू जवळ बाळगणार्या व्यक्तीकडे लवकर आकर्षित होऊ शकते.. अजूनही गावा कडे विजा चमकत असतांना कुदळ, फावडे, लोखंडी पक्कड, खुरपे आदी वस्तू घराच्या उंबर्या बाहेर अंगणात टाकल्या जातात. अशा वेळी विज या वस्तूंवर पडते व दरवाजातून घरात प्रवेश करण्याची शक्यता कमी होते. सोन्या-चांदीचे दागिणे विजा चमकतांना परिधान करून मोकळ्या जागी काम करणार्या  स्त्रीयांवर विज कोसळून अपघात झाल्याचे प्रमाण मोठे आहे.

  * विजा आणि भूमिगत जलसाठा : वीज कोसळलेल्या ठिकाणी विहिर खणल्यास पाणी लागते अशी एक धारणा आहे. पठारी भागातील काही शेतक-यांचा अनुभव ही गोष्ट सत्य असल्याचे सांगतो. मात्र डोंगरावर अनेक ठिकाणी विजा कोसळतात. तेथे खोलवर विहिर खणल्यास देखील पाणी लागत नाही असाही अनेकांचा अनुभव आहे. भूमिगत जलाचा साठा आणि तो शोधण्यासाठी विजांचा उपयोग यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

  * कोरडी झाडे : कोरडया झाडाखाली थांबणे सुरक्षित असते हा देखील गैरसमज आहे. झाडे ही कमी रोधकाचा मार्ग असल्याने विजांना कोसळण्यासाठीचे सोईचे स्थान बनते. त्यामुळे कोरडे असले तरी विजा देखील कोसळताना झाडांचा आसरा घेवू नये.


  किरणकुमार जोहरे, पुणे
 • (भौतिकशास्त्रज्ञ, मॉन्सून, विजा व गारा यांचे अभ्यासक)
 • मोबाइलः 9970368009,e-mail: kkjohare@hotmail.com

LEAVE A REPLY

*